महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला १० नोव्हेंबरपासून प्रारंभ

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह येथे सुरू होणार आहे. १० नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी सांगितले आहे.
स्पर्धेमध्ये एकूण १८ संघांचा सहभाग असून रत्नागिरी जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.

स्पर्धा वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

दिनांक १० नोव्हेंबर
नाटक – अकल्पित
संस्था – दर्यावर्दी प्रतिष्ठान
लेखक – हरिष सामंत
दिग्दर्शक – संदीप वनकर

दिनांक ११ नोव्हेंबर
नाटक – फूर्वज
संस्था – ज्ञान प्रबोधनी पंचक्रोशी शिक्षण
प्रसारक मंडळ दत्तवाडी
लेखक – प्रसाद पंगेरकर
दिग्दर्शक – प्रसाद पंगेरकर

दिनांक १२ नोव्हेंबर
नाटक – इंडियाज मोस्ट वॉन्टेड
संस्था – कै. संभाजीराव महादेवराव भोसले
माजी सैनिक फाउंडेशन संचालित
ऐशप्रिया आर्ट अकॅडमी.
लेखक – संजय बेलोसे
दिग्दर्शक – मंगेश डोंगरे

दिनांक १३ नोव्हेंबर
नाटक – मंगलाक्षता
संस्था – खल्वायन, रत्नागिरी
लेखक – श्रीराम हर्षे
दिग्दर्शक – मनोहर जोशी

दिनांक १४ नोव्हेंबर
नाटक – इम्युनिटी (द व्हॉईस ऑफ टॉलरन्स)
संस्था – खरडेवाडी क्रीडा मंडळ मुंबई, मेर्वी,
रत्नागिरी
लेखक – डॉ. सोमनाथ सोनवलकर
दिग्दर्शक – संदेश तोडणकर

दिनांक १७ नोव्हेंबर
नाटक – येऊन येऊन येणार कोण?
संस्था – श्रीरंग, रत्नागिरी.
लेखक – चैतन्य सरदेशपांडे
दिग्दर्शक – भाग्येश खरे

दिनांक १९ नोव्हेंबर
नाटक – ऑक्सिजन
संस्था – नेहरू युवा कलादर्शन नाट्य मंडळ,
पाली
लेखक – अनिल काकडे
दिग्दर्शक – रोहित नागले

दिनांक २० नोव्हेंबर
नाटक – तीनसान
संस्था – प्रायोगिक थिएटर्स असोसिएशन
लेखक – अमर खामकर
दिग्दर्शक – अमर खामकर

दिनांक २१ नोव्हेंबर
नाटक – अग्निपंख
संस्था – समर्थ रंगभूमी, रत्नागिरी
लेखक – प्र. ल. मयेकर
दिग्दर्शक – ओंकार पाटील

दिनांक २४ नोव्हेंबर
नाटक – सुखांशी भांडतो आम्ही
संस्था – श्री देव गणपती ऑफ धामापुर अँड
मारुती ऑफ माखजन
लेखक – अभिराम भडकमकर
दिग्दर्शक – मंदार साठे

दिनांक १ डिसेंबर
नाटक – कांचनमृग
संस्था – संकल्प कलामंच, रत्नागिरी.
लेखक – राजेंद्र पोळ
दिग्दर्शक – गणेश गुळवणी

दिनांक २ डिसेंबर
नाटक – अनपेक्षित
संस्था – श्री लक्ष्मीकांत विविध कार्यकारी
कॉ.ऑ. सोसायटी भाट्ये.
लेखक – निलेश रमेश जाधव
दिग्दर्शक – निलेश रमेश जाधव

दिनांक ३ डिसेंबर
नाटक – एक्सपायरी डेट
संस्था – श्री शिवाई सहकारी पतसंस्था मर्या.
येळवण
लेखक – चैतन्य सरदेशपांडे
दिग्दर्शक – श्रद्धा मालवदे

दिनांक ४ डिसेंबर
नाटक – तृतीयपंथी पुरुष
संस्था – सम्राट फाउंडेशन
लेखक – मुकेश जाधव
दिग्दर्शक – प्रशांत नाईक

दिनांक ५ डिसेंबर
नाटक – जन्मवारी
संस्था – कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी
संघ कोतवडे, रत्नागिरी
लेखक – हर्षदा बोरकर
दिग्दर्शक – प्रसाद धोपट

दिनांक ६ डिसेंबर
नाटक – तू पालन हारी
संस्था – स्टार थिएटर, रत्नागिरी
लेखक – अमेय धोपटकर
दिग्दर्शक – अमर रणभिसे

दिनांक ७ डिसेंबर
नाटक – नमान
संस्था – सुमती थिएटर्स, रत्नागिरी
लेखक – शेखर मुळ्ये
दिग्दर्शक – शेखर मुळ्ये

दिनांक ९ डिसेंबर
नाटक – ईठ्ठला
संस्था – वीरशैव समाज, लांजा
लेखक – अमोल रेडीज
दिग्दर्शक – अमोल रेडीज

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button