ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षणसायन्स & टेक्नॉलॉजीसाहित्य-कला-संस्कृती

६३ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात सह्याद्रि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार

संगमेश्वर, दि. १० : कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे हि खूप मोठी व महत्वाची गोष्ट असते. यावर्षी घेण्यात आलेल्या ६३व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र शिल्प कलामहाविद्यालयातील कलाकार विभागातून १ व २४ विद्यार्थ्यांच्या २७ कलाकृतींची निवड झाली आहे.

या निवडलेल्या कलाकृतीनमधून शिल्पकला विभागातून कु तुषार पांचाळ व कु. प्रथमेश गोंधळी यांना गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे.तसेच याच कलामहाविद्यालयातील प्रा. रुपेश सुर्वे यांच्या शिल्पाची या कलाप्रदर्शनात निवड झाले आहे.
या वर्षीचे ६२वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन ठाणे या ठिकाणी संपन्न होणार आहे.यामुळे एवढ्या कलाकृती प्रदर्शनात दिसणार हि मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

निवड झालेल्या विद्यर्थ्यांची नावे खालीलप्रमाणे –
मूलभत अभ्यासक्रम -उर्वी पटेल, शुभम जाधव, शिवम नलावडे, कुणाल शिगवण, लक्ष्मण परुळेकर, रुचित सांगळे, राकेश भेकरे, विराज खाडे, चैतन्य मांडवकर
कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष -भूषण वेलये
कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष -सिद्धार्थ भोवड, शुभम वाडये, सौरभ साठे रेखा व रंगकाला विभाग – करण आदावडे, राज वरेकर शिल्प व प्रतिमानबंध कला – राज कुंभार, विशाल मसणे, प्रितेश गोणबरे, तुषार पांचाळ, संकेत गोरीवले, प्रथमेश गोंधळी, सोहम धामणस्कर, सार्थक आदवडे, पंकज सुतार या विद्यर्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत.

सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार मा. प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के , सौ. पूजाताई निकम, कलामहाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव यांनी विद्यर्थी व प्राध्यापक वर्गाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button