महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हललोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

Aangnewadi Yatra 2026 | अंगणेवाडी जत्रेसाठी धावणार विशेष गाड्या; वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि बुकिंग डिटेल्स

रत्नागिरी: श्री भराडी देवीच्या अंगणेवाडी जत्रेसाठी (Aangnewadi Yatra 2026) जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, कोकण रेल्वेने मडगाव आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.

विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

१) गाडी क्र. ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक (टर्मिनस) साप्ताहिक स्पेशल:

ही गाडी ०७ आणि ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

२) गाडी क्र. ०१००३ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – मडगाव साप्ताहिक स्पेशल:

ही गाडी ०८ आणि १० फेब्रुवारी २०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे (Halts):

​या विशेष गाड्या करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबतील.

डब्यांची रचना (Coach Composition):

  • ​या गाडीला एकूण २२ कोच असतील.
  • ​यामध्ये २० स्लीपर कोच (Sleeper Class) आणि ०२ एसएलआर (SLR) कोचचा समावेश आहे.

बुकिंग कधी सुरू होणार?

गाडी क्र. ०१००४ साठीचे बुकिंग ०४ फेब्रुवारी २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर (PRS), इंटरनेट आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे.

महत्त्वाची सूचना: अधिक माहितीसाठी आणि वेळपत्रकातील बदलांसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button