Art of Living | श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत २२ जानेवारीला ‘भक्ती उत्सव’

रत्नागिरी: रत्नागिरीकरांसाठी एक मोठी आध्यात्मिक पर्वणी चालून आली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे (Art of Living) संस्थापक आणि जागतिक आध्यात्मिक गुरु परम पूज्य श्री श्री रविशंकर यांच्या दिव्य उपस्थितीत रत्नागिरीत भव्य ‘भक्ती उत्सव’ महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:
- तारीख: २२ जानेवारी २०२६
- वेळ: सायंकाळी ठीक ६:०० वाजता
- स्थळ: वक्ते जवळेकर कॉलेजचे पटांगण, रत्नागिरी.
- प्रवेश: सर्व नागरिकांसाठी विनामूल्य (मोफत).
भक्ती उत्सवाचे आकर्षण
या सोहळ्यात श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, ध्यान आणि सुश्राव्य संगीताचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून मनाला शांती देणारा हा कार्यक्रम रत्नागिरीतील आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरेल.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
रत्नागिरी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा नागरिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून, रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.





