Fatak High School | राधिका भिडेच्या गायनाने फाटक हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला ‘चार-चाँद’

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या फाटक हायस्कूल व गांगण – केळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला विशेष अतिथी म्हणून आय पाॅपस्टार गायिका, संगीत निर्माता, फाटक हायस्कूलची (Fatak High School ) माजी विद्यार्थिनी राधिका भिडेला निमंत्रित करण्यात आले होते. तिच्या गायनाने या स्नेहसंमेलनात रंगत आणली. या प्रसंगी राधिका भिडेचा दि न्यू एज्युकेशन सोसायटी रत्नागिरीच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे यांच्या हस्ते भेटवस्तू आणि शताब्दी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रंगमंचावर मुख्याध्यापक राजन कीर उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी संस्था पदाधिकारी तसेच सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे खास आकर्षण असलेल्या संगीत निर्माता राधिकाने सादर केलेल्या ‘ मन धावतया’ आणि ‘उजेड पडला छान गनोबा ‘ या लोकप्रिय गीताने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांनीही तिच्यासोबत गायन करत वातावरण उत्साही केले.
लोकनृत्य स्पर्धेत नववी ई चे गोंधळ नृत्य, दहावी अ चे वारकरी नृत्य आणि नववी अ चे शेतकरी नृत्य यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. दिनेश नाचणकर, शिल्परेखा जोशी यांच्यासह विद्यार्थ्यांनीही सूत्रसंचालन केले.





