महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
कोमसापने जीवनगौरव पुरस्कार देऊन नवी ऊर्जा दिली : ज्येष्ठ कवयित्री वसुधा नवाळी
उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : माझ्या ८७ व्या वर्षी मी कार्यक्षेत्रात केलेल्या काव्य लेखनाची दखल घेऊन एक ज्येष्ठ कवयित्री या नात्याने कोमसापने मला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले त्यामुळे भविष्यात काव्यलेखन करण्याची ऊर्जा कोमसाप उरणने दिली आहे असे विचार ज्येष्ठ कवयित्री वसुधा नवाळी यांनी मधुबन कट्ट्यावरील कविसंमेलनात काढले.

यावेळी दुसरे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्त्व गायक कवी रमेश थवई यांनी ही आपल्या भाषणात कोमसापच्या कार्याचा गौरव करून,केलेल्या सत्काराबाबत आभार मानले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सुरेश मेस्त्री होते.प्रमुख उपस्थितीत साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील,तालुका शिक्षण ग.शिक्षणाधिकारी निर्मला घरत, मच्छिंद्र घरत, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम,निळवर्ण दत्ताराम, साहेबराव ओहोळसर,मधुबन कट्टा अध्यक्ष राम म्हात्रे,आर.सी गावंड,नरेश ठाकूर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.प्रास्ताविक मच्छिंद्र म्हात्रे तर सुरेख सूत्रसंचालन संजय होळकर यांनी केले.हा कार्यक्रम विमलातलाव उरण येथे मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
” म्हणींवर माझी कविता “ या विषयावरील कविसंमेलनात
भरत पाटील,रमण पंडित, रामचंद्र म्हात्रे, संजीव पाटील, संपदा ठाकूर,वसुधा नवाळी, मारुती तांबे, शिवप्रताप पंडित, म.का.म्हात्रे,नरेश पाटील, संग्राम तोगरे,साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी.इत्यादीं कवींच्या दर्जेदार कवितांनी श्रोत्यांना भरपूर आनंद दिला.





