Ladki bahin Yojana | चरवेलीत लाडक्या बहिणींनी मंत्र्यांच्या हाती राखी बांधून मानले राज्य शासनाचे आभार !
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तालुक्यातील चरवेली गावाच्या विकासाचा आढावा आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी चरवेली गावाला भेट दिली. यावेळी विशेष म्हणजे चरवेलीच्या लाडक्या बहिणींनी ना. सामंत यांच्या हातती राखी बांधून महिलांसाठी सुरु केलेल्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेबद्दल आभार मानले.
ग्रामस्थांच्या विकासासोबतच लेक लाडकी योजना, शुभमंगल योजना, वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थयात्र योजना, ३ गॅस मोफत योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, युवकांची युवा कार्य योजना या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी चरवेली गावात आलो असल्याचं ना. सामंत यांनी सांगितलं.
या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेना तालुका प्रमुख तुषार साळवी, विभागप्रमुख सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.