आ. नीलेश राणे यांनी घेतले रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या महागणपतीचे दर्शन!

- मंडळाच्या वतीने आ. राणे यांच्या हस्ते दोन विद्यार्थिना सायकल प्रदान
- जीजीपीएस गुरुकुलचे विद्यार्थी, साई समर्थ रिक्षा स्टैंड, श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ पदाधिकाऱ्यांचा सत्कार
रत्नागिरी :*रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथील रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या रत्नागिरीच्या महागणपतीचे कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी दर्शन घेतले.
रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच माघी गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रत्नागिरीकरांनी या उत्सवाचे स्वागत केले आहे. आज कुडाळ मालवणचे आ. नीलेश राणे यांनी या रत्नागिरीचा महागणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तर यावेळी मंडळाच्या वतीने दोन होतकरू शाळेय विद्यार्थिनींना आ. नीलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये स्वामी स्वरुपानंद विद्यामंदीर, पावसची इयत्ता ७ वी अ मधील सिम्मी कल्पेश वालम या गोळप धोपटवाडी राहणाऱ्या विद्यार्थिनीला तसेच दामले विद्यालय रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. 15 मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या अवनी मिलिंद कोकरे या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. आज सकाळ श्री महागणपती समोर रत्नागिरीतील जीजीपीएस गुरुकुलच्या इयत्ता ५, ६ आणि ९ वी चे विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रमुख नितीन लिमये यांच्या मार्ग्दर्षांखाली सलग अथर्वशीर्ष पठण केले.
यावेळी गुरुकुल शिक्षक अमोल पाष्टे, सौ. अश्विनी तांबे आणि श्रद्धा टिकेकर हेही उपस्थित होते. या शिक्षकांचा आ. राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर साई समर्थ रिक्षा स्टैंड आरोग्य मंदिर रत्नागिरीचे दीपक सूवरे आणि सहकारी आणि श्री गुरुदेव दत्त सेवा मंडळ आरोग्य मंदिरचे आदेश आगरे यांचा सत्कार आ. राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश मगदूम, उद्योजक अमित देसाई, मंडळाच्या उपाध्यक्ष अनुष्का शेलार, सचिव प्रवीण लिंगायत, खजिनदार अमोल देसाई, सहसचिव अनघा निकम-मगदूम, सल्लागार मनोज घडशी, सदस्य राहुल भाटकर, निखिल शेट्ये, रामदास शेलटकर, राजेश झगडे, अमृत गोरे, साईनाथ सावंत, रोहित भुजबळराव, सागर सोलकर, अभिलाष कारेकर, शिवाजी कारेकर, प्रणव सुर्वे, श्रीनाथ सावंत, ययाती शिवलकर, अशोक वाडेकर, सौ. अश्विनी देसाई, कविता अमर शेठ आदी उपस्थित होते.