उरण मोरा येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात

उरण दि १२ (विठ्ठल ममताबादे )भारतीय वाल्मिकी समाजाच्या वतीने प्रथमच उरणमधील सिद्धार्थ नगर,मोरा येथे महर्षी वाल्मिकी(भगवान)यांची वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने रॅली काढण्यात आली. वाल्मिकी महाराजांची( भगवान) भूमिका (हरपाल चांद्रू वाल्मिकी ) यांनी साकारली.लव ची भूमिका (अद्विक प्रमोद वाल्मिकी ) या लहान मुलांनी आणि कुष ची भूमिका (देवेश जितू वाल्मिकी )या चिमुकल्याने पार पार पाडली.

महर्षी वाल्मिकी महाराजांची रॅली मध्ये मोठ्या संख्येने वाल्मिकी समाज बांधवांनी व महिलांनी भाग घेऊन आपली उपस्थिती दाखवली व वाल्मिकी महाराजांची( भगवान) रॅली कोणाला ही त्रास न देता यशस्वीपणे पार पाडली. लहान मुलांसाठी सांस्कृतिक डान्स व लकी ड्रॉ चा कार्यक्रम घेण्यात आले.आणि आलेले सर्व पाहुणे व वरिष्ठ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आले.
कियारा रवी गुहेर या चिमुकलीने नशा मुक्ती या विषयावर आपले विचार मांडून सर्वांचे मन जिंकले.वाल्मिकी समाजाचे गौरव असलेल्या सर्व शिक्षित वर्ग, सर्व मुलांचा सन्मान करण्यात आले.ज्यांनी उत्कृष्ट डान्स केला त्यांना पारितोषिक देण्यात आले.माया राजेंद्र गुदरीया,संगीता बिन्नू गुदरिया ,पूनम सुरज वाल्मिकी जागृती सुनील पारचां ,लक्ष्मी छोकर,विजय पाली, संतोषी वाल्मीकि,मंतोष वाल्मीकि, मुरारी वाल्मीकि, सुनील परचा, प्रेमपाल , सुरेश शर्मा, सूरज वाल्मीकि, सेक्रेटरी जोगिंदर सिंह, कार्याध्यक्ष अजय वाल्मीकि, महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सुनील वाल्मीकि यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष बंटी वाल्मिकी व खजिनदार समीर पारचा यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन नियोजन केल्याने उपस्थित सर्व मान्यवर, समाज बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले.आणि शॉल आणि श्रीफळ देऊन सन्मानित केले.जागृति सुनील पारचां यांनी वाल्मिकी समाजाला संबोधित करून एकजूट राहण्याचे आवाहन केले.माया राजेंद्र गुदरिया यांनी आपल्या गोड आवाजाने सुंदर असा एक गाणे बोलून सर्वांना मंत्मुग्ध केले.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ चे प्रथम पारितोषिक सुरज वाल्मिकी यांनी पटकाविले. दुसरा बक्षीस कविता चव्हाण हिने पटकाविले.उरण वाल्मिकी समाजाच्या वतीने सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आले.एकंदरीत महर्षी वाल्मिकी जयंती उरण मोरा येथे मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाली.