चिपळूणची कन्या पूजा लढ्ढा हिने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले!

चिपळूण : चिपळुणातील योग साधिका पूजा लढ्ढा हिने नेपाळमधील काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासने स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. २३ ते ४० वयोगटात तीने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
या स्पर्धेत विविध देशांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. तगड्या स्पर्धकांच्या उपस्थितीतही पूजाने अत्यंत लक्षवेधी सादरीकरण करत न्यायमंडळाची दाद मिळवली. तिच्या प्रदर्शनातील स्थिरता, तंत्र आणि सौंदर्य यामुळे तिला सर्वाधिक गुण मिळाले. भारतीय संघातील इतर सदस्यांसोबत पूजाने या स्पर्धेपूर्वी दीर्घ काळ तयारी केली होती. योगातील तिची निष्ठा, सातत्यपूर्ण सराव आणि मानसिक स्थैर्य या यशामागील महत्त्वाची कारणे ठरली.
- हे देखील अवश्य वाचा : Konkan Railway | दादर- सावंतवाडी राज्यराणीला तुतारी एक्सप्रेस का म्हणतात?
- छोटा भीमचा रेल्वे प्रवाशांना मोठा संदेश!
- पनवेलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सप्टेंबरपासून उड्डाण!
पूजा लढ्ढा हिच्या या कामगिरीमुळे चिपळूण शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल शहरात विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, योगविद्येच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय तिरंगा फडकवणाऱ्या पूजाचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.