जपानमध्ये आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत महाराष्ट्राचा जलवा!

ओसाका (जपान) : जपानमधील ओसाका शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद आणि प्रदर्शनामध्ये (The International Industry Conference and Expo) आज महाराष्ट्र
उद्घाटन एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी बोलताना महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीवर भर देण्यात आला.

सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट आहे. यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. या परिषदेत १५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
यावेळी महाराष्ट्राच्या नेतृत्व करताना महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयसमंत यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वतःच १ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्र एक सर्वाधिक बलाढ्य राज्य म्हणून पुढे येत आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळाले असून, महाराष्ट्र लवकरच गुंतवणुकीचे केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.