जहांगीर कला दालनात मान्सून प्रदर्शनासाठी सावर्डे येथील सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट विद्यार्थ्यांची निवड
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240613-wa00192969584784890157606-780x470.jpg)
संगमेश्वर दि. १३ : नामवंत जहांगीर कलादालनाची स्थापना १९५२ साली झाली असून आज ७२ वर्षांनी देखील हे कलादालन नवोदित कलाविद्यार्थ्यांना जगासमोर प्रदर्शित करण्याची परंपरा अविरतपणे करत आहे.यासाठी हे कलादालन अनेक उपक्रम राबवित असते. दरवर्षी मान्सून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात यामधून काही निवडक विद्यार्थ्यांच्या कलाकृती निवडून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येते. हा त्या विद्यार्थ्यांसाठी व कलामहाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट असते.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240613-wa00192969584784890157606-719x1024.jpg)
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240613-wa00168925958684519217368-768x1024.jpg)
यावर्षी घेण्यात आलेल्या ४४व्या मान्सून प्रदर्शनासाठी साठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्रि स्कूल ऑफ सावर्डे या चित्र -शिल्प कलामहाविद्यालयातील कु. सुजल निवाते, कुमारी. तुळशी भुवड यांनी पाठविलेल्या चित्रांची निवड झाली आहे. विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कलामहाविद्यालयास तसेच कोकणचे जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव व प्राध्यापकांना देत आहेत.
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240613-wa00205686958845339287422-698x1024.jpg)
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2024/06/img-20240613-wa0017417674365944105332-745x1024.jpg)
यशस्वी विद्यार्थ्यांचे सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्यध्यक्ष व संगमेश्वर -चिपळूण मतदार संघांचे आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, सेक्रेटरी महेश महाडिक, जेष्ठ चित्रकार शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, स्कूल कमिटी सर्व सदस्य, कला महाविद्यालयाचे प्राचार्य. माणिक यादव तसेच प्राध्यापकवर्ग यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.