ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृतीस्पोर्ट्स

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत लांजा तालुका संघाला तब्बल १८ पदके

  • त्रिशा यादव बेस्ट फायटर पुरस्काराने सन्मानित

लांजा : नुकत्याच्या चिपळूण येथे जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीतील 30 खेळाडूंनी सहभागी होऊन 18 पदके मिळवून अग्रगण्य कामगिरी करत यश संपादन केले. तसेच त्रिशा गणेश यादव हिला 14 वर्षमुली वयोगटात बेस्ट फायटर पुरस्कार सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीयपंच, प्रशिक्षक, राष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी विरेंद्र आचरेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत शहानूर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अकॅडमी च्या सहकार्याने पुष्कर स्वामी मंगल कार्यालय हॉल चिपळूण येथे 25 वी जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष व्यंकटेश राव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांत घडशी, संचालक संजय सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेत लांजा तालुका तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमीतील खेळाडूंनी 7 वर्षाखालील स्पेशल गट मुलींमध्ये स्वर्णीम श्रेयस शेट्ये सुवर्णपदक, युगा प्रसाद डोर्ले,मायरा कुणाल जगताप रौप्य पदक,अन्वी सचिन पवार कांस्य पदक, मुलांच्या गटामध्ये आराध्य महेश महाले सुवर्णपदक, सब ज्युनियर गट मुलींमध्ये त्रिशा गणेश यादव सुवर्णपदक व बेस्ट फायटर, कॅडेट गट मुलींमध्ये भक्ती भागवत कुंभार,परी संजय जड्यार,तेजस्वी दशतर लाड रौप्य पदक,तीर्था गणेश यादव कांस्यपदक, कॅडेट गट मुलांमध्ये रुद्र संजय सुर्वे सुवर्णपदक, सय्यद साद साजिद सलीम,भाव्य हरेश पटेल रौप्य पदक, नैतिक रामेश्वर शेट्ये कांस्य पदक, जूनियरगट मुलांमध्ये योगेश ईश्वर तोंडारे सुवर्णपदक, राकेश बाळू पवार, श्रेयस समीर सावंत कांस्य पदक तसेच आराध्य कमलाकर सावंत, दत्तप्रसाद संजय बावदनकर, आर्या सचिन पवार, वृत्ती रंजन पावसकर, रोहन चंद्रकांत साबळे, आदी रंजन पावसकर, भाविन विनोद पटेल, आफताब झहीर कोंडकरी, अब्दुल्ला रईस सय्यद,अर्ष म्युझिब कालसेकर, प्रतीक मंगेश कोतवडेकर यांनी सहभाग घेतला होता.

या सर्व खेळाडूंना लांजा तालुका प्रमुख प्रशिक्षक तेजस पावसकर, शितल आचरेकर, गौरव खेडेकर, गणेश तोंडारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व पदक विजेते व सहभागी खेळाडू, प्रशिक्षक यांचे तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजाचे अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल रेडीज, सचिव तेजस्विनी आचरेकर, सहसचिव अनुजा कांबळे, सदस्य रोहित कांबळे, अकॅडमीचे मार्गदर्शक तेजस वडवलकर व समस्त पालक वर्ग यांनी अभिनंदन केले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button