ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृतीस्पोर्ट्सहेल्थ कॉर्नर

मनोज भाटवडेकर ठरले सायकल गौरव पुरस्काराचे मानकरी!

दापोलीत तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन उत्साहात

दापोली : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले. यामध्ये देश विदेशातील अनेक दिग्गज नावाजलेले सायकलप्रेमी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांनी संमेलनाचे उदघाटन केले. अनेकांना लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे मनोज भाटवडेकर यांना या वर्षीचा सायकल गौरव पुरस्कार देण्यात आला.

पाच दिवस या संमेलनात सादरीकरण सत्रे, मुलाखती, चर्चासत्र, अनुभव कथन, सायकल दिंडी, सायकल चित्रपट महोत्सव इत्यादी अनेक सायकल विषयक भरगच्च माहितीपूर्ण कार्यक्रम झाले. रशिया येथील अलेस्की बर्नोव्ह, लोहपुरुष डॉ तेजानंद गणपत्ये, मिलिंद खानविलकर, रुपेश तेली कुडाळ(डेक्कन क्लीफहँगर), संजय सावंत (नर्मदा परिक्रमा), यश म्हसकर (उमलिंगला पास), प्रेमसागर मेस्त्री महाड, सुबोध गांगुर्डे (३६५ दिवस ३७० किल्ले), पूजा बुधवले (१२ ज्योतिर्लिंग यात्रा), डॉ रामेश्वर भगत, गोपाल साबे पाटील (GRM), सागर बोडके नाशिक(अंधत्वावर मात), मुंबई परिसरातील धनंजय मदन, सायकल मेयर सुधिर चकोले, प्रज्ञा म्हात्रे (आम्ही सायकल प्रेमी), कुणाल सुतार, पुरनसिंह मेहरा, संजय खाडे, डॉ सुनील पुणतांबेकर(डोंबिवली सायकल मित्र संमेलन), निलेश कुष्टे इत्यादी इत्यादी अनेक नावाजलेले सायकलस्वार यांचे अनुभवकथन, सादरीकरण सत्रे, प्रेरणादायी व विचार करायला लावणारे होते. २०२३ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. LRM SR रॉकेटमॅन अहमदअली शेख, अमित कवितके, डॉ मनिषा वाघमारे, प्रशांत दाभोळकर, रोहन पवार, श्रीनिवास गोखले, विनायक पावसकर, अथर्व शेंडे, ओमकार फडके, महेश सावंत, डॉ अश्विनी गणपत्ये, इशान धनश्री गोखले, नभा श्रावणी सिद्धेश बांदिवडेकर, प्रशांत पालवणकर, संजय मांजरे इत्यादी अनेकांना गौरवण्यात आले.

या सायकल संमेलनाचे नियोजन करण्यासाठी विनायक वैद्य, अंबरीश गुरव, सुरज शेठ, डॉ संदेश जगदाळे, डॉ रामदास महाजन, राजेंद्र नाचरे, शैलेश पेठे, प्रसाद देवस्थळी, धिरज पाटकर, अमित पेडणेकर आणि खेड, रत्नागिरी, चिपळूण, दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायकल संमेलनात अनेक दिग्गज सायकलस्वारांची भेट, ओळख, मार्गदर्शन यामुळे सर्वजण खुश झाले. आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुन तंदुरुस्त आरोग्य जगण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button