महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेची कार्यकारिणी अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे

चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोनबरे तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतीच मसापची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सर्वसाधारण सभेत सन २०२५-३०च्या कार्यकारिणीचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे
कार्याध्यक्ष धीरज वाटेकर
उपाध्यक्ष प्रा. सोनाली खर्चे
उपाध्यक्ष मनिषा दामले
कार्यवाह प्राची जोशी
कोषाध्यक्ष प्रकाश घायाळकर
स्पर्धा समिती – रविंद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने.
कार्यक्रम समिती – शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, कैसर देसाई.
वाङ्मय समिती – मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे, स्नेहा ओतारी.

मसाप ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. 
आगामी काळात चिपळूण शाखेच्या वतीने आगामी काळात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा आदी कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी मसापचे कोकण प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, भाषा अभ्यासक-समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button