रत्नागिरीच्या श्रीराम मंदिरातील सोहळ्यासाठी निरामय योगा आणि साधक यांच्यातर्फे ५१ हजारांची देणगी
रत्नागिरी : निरामय योगा आणि साधक यांच्यातर्फे श्रीराम मंदिर समिती रत्नागिरीचे श्री. राजन शेट्ये, श्री . संतोष रेडीज, श्री. राकेश चव्हाण, श्री.अरविंदशेठ जैन,श्री. संदीप डोंगरे यांच्याकडे ५१ हजार रूपयांची भरघोस देणगी देण्यात आली.
निरामय योगा आणि निरामय योगाचें योग साधक यांच्यातर्फे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळयानिमित्त,रत्नागिरी येथे श्रीराम मंदिरात होणाऱ्या सोहळ्यासाठी 51000/- ( एकावन्न हजार रुपये देणगी देण्यात आली.
निरामय योगा क्लासेसतर्फे नेहमीच समाजोपयोगी अनेक कार्यक्रम राबविले जातात जसे. रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहीम, दर रविवारी भाटे बीच येथे मोफत योग शिबिर, आर्थिकदृष्ट्या कमजोर नागरिकांसाठी मोफत योगा शिकवणे, अयोध्या येथील श्रीराम मंदिर उभारण्यासाठी देखील निरामय योगातफेँ रत्नागिरीतून देणगी पाठवली होती.
तसेच सामाजिक कोणताही कार्यक्रम असो अशा ठिकाणी वेळोवेळी सढळ हस्ते निरामय योगा आणि त्यांचे योग साधक हे नेहमीच मदतीसाठी पुढे असतात.
निरामय योगाचे योग गुरु श्री विरू स्वामी सर हे पतंजलीचे मुख्य योग शिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक असून त्यांचे रत्नागिरी मारुती मंदिर येथे योगाचे ऑफलाईन तसेच ऑनलाईन क्लासेस चालतात. ते नेहमीच सर्वांनी योग करणे किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगत असतात. निरामय योगा क्लासेस मध्ये बीपी, शुगर, थायरॉईड, हृदयरोग, लिव्हर, किडनी, हाडांचे विकार असे अनेक असाध्य आजार अगदी पहिल्या दिवसापासून नियंत्रणात येतात आणि नियमित योग सराव केल्याने हे आजार 99% बरे होतात असे श्री.विरू स्वामी सर सांगितले आणि हे आजपर्यंत हजारों रुग्णांनी अनूभवले असून आजपर्यंत हजारो साधकानी याचा लाभ घेतलेला आहे. रत्नागिरीकरांनी निरामय योगाचां लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी सर यांनी केले आहे. यासाठी इच्छुकांनी निरामय योगा रत्नागिरी येथे 9028899412 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.