लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी दरम्यान विशेष ट्रेन!

रत्नागिरी : दसरा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा (Weekly Special Train) सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही सेवा १७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आठ फेऱ्या चालवेल. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक आणि वेळापत्रक
०११७९ ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रत्येक शुक्रवारी सकाळी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी ०११८० ही गाडी सावंतवाडी रोड येथून १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ०७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रत्येक शुक्रवारी रात्री २२.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे आणि रचना
ही विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. यात ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांचा समावेश आहे.
गाडीच्या रचनेत १ एसी फर्स्ट क्लास, ३ एसी-२ टियर, ७ एसी ३-टियर, ८ स्लीपर क्लास, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन यांचा समावेश असेल, ज्यामुळे विविध श्रेणीतील प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येईल.