महाराष्ट्रलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे : महाराष्ट्र कला अकादमी


रत्नागिरी, दि. 5  : दि. 7 सप्टेंबरपासून सार्वजनिक गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. या अनुषंगाने, स्पर्धेचे परीक्षण करण्याची, परीक्षणाचे समन्वय व संयोजन करण्याची आपली जवाबदारी लक्षात घेता, पुढील मार्गदर्शक तत्वांचे अवलोकन करावे. या बाबी अनिवार्य असून, त्याची पूर्तता मंडळांकरवी होणे तसेच परीक्षणादरम्यान होणे आवश्यक आहे. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून स्पर्धेस अधिकाधिक यशस्वी करावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.


या बाबी खालील पुढीलमाणे : मंडळाचे नाव आणि नोंदणी प्रमाणपत्र / स्थानिक स्वराज्य संस्था अथवा पोलिसांचा परवाना तपासणे. उत्सवस्थळाचा पत्ता, कार्यकारिणी, संपर्क क्रमांक इ. बाबी तपासून घेणे. संस्थेच्या / मंडळाच्या बँक खात्याचा तपशील. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे (रद्द धनादेश किंवा पासबुकची छायांकित सत्यप्रत) आणि पॅन तपासणे. सदर कार्गदपत्रे उपलब्ध नसल्यास, त्याविषयी तातडीने कार्यवाही करण्यास सांगणे. अथवा, स्टॅम्प पेपरवर (मूळ प्रत) एखाद्या कार्यकारिणी सदस्याचे खाते सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीने अधिकृत केल्याचा तपशील घेणे. परीक्षणादरम्यानं गुणांकनासाठी आवश्यक माहितीचा तपशील वावनिहाय तपासणे. तपासलेला तपशील आणि अर्जात नमूद विषयाची प्रत्यक्ष स्थिती यांच्या अनुषंगाने गुणांकन करणे. गुणांकन करणाऱ्या सर्व सदस्यांची स्वाक्षरी घेणे. उच्च दर्जात (HD) छायाचित्रे घेणे व सुस्पष्ट छायाचित्रण करणे.

सहभागी मंडळांना परीक्षणासाठी येण्यापूर्वी पूर्वसूचना देणारे पत्र पाठवणे. परीक्षण झाल्यानंतर सदर मंडळाची परीक्षा झाल्याची पोहोच घेणे.
काही गणेशोत्सव मंडळांचा उत्सव कालावधी दीड दिवस, अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा “दहा दिवस असतो. यामुळे, ७ सप्टेंबर २०२४ पूर्वी आपल्या जिल्ह्यातील सहभागी मंडळांशी संपर्क करून
त्यांच्या उत्सव कालावधीची माहिती घेणे. त्यानुसार परीक्षणाचे नियोजन करणे. आपल्या जिल्ह्यातील विजेत्या मंडळाचा अहवाल अकादमीस सर्व आवश्यक कागदपत्रांसह २० सप्टेंबर २०२४ पूर्वी, पेन ड्राईव्ह आणि ई-मेलद्वारे mahotsav.plda@gmail.com वर कळवणे. संदर्भीय शासन निर्णयान्वये, मुद्दा क्रमांक २.३ नुसार, या गणेशोत्सव स्पर्धे अंतर्गत भाग घेणाऱ्या मंडळांपैकी मागील सलग दोन वर्षे आपल्या जिल्ह्यातून पारितोषिक प्राप्त झालेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदा पारितोषिकास पात्र ठरणार नाहीत. या कारणे, असे मंडळ आढळल्यास या मंडळाचे नियमानुसार परीक्षण करून त्यांस सदिच्छा द्याव्या. परंतु, त्यांची पारितोषिकासाठी शिफारस अथवा विचार करू नये. सदर गणेशोत्सव स्पर्धेअंती राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची यादी स्वतंत्रपणे शासन निर्णयाद्वारे निर्गमित करण्यात येईल. हा शासन निर्णय निर्गमित झाल्यावर, आपण आपल्या जिल्ह्यातील विजेत्या मंडळात संपर्क करून पुढील कार्यवाहीच्या निर्देशपत्राच्या संदर्भाने कार्यवाही करावी.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button