पाटगाव येथील श्री स्वयंभू सांब मंदिराचा ९ फेब्रुवारीपासून कलशारोहण सोहळा
देवरूख (सुरेश सप्रे) : देवरूख व पाटगांव मधील सप्तलिंगी नदीच्या काठावर वसलेल्या स्वयंभू सांब मंदिराचा तसेच श्री गणेश, श्री पार्वती, श्री महालक्ष्मी, श्री निनावीदेवी, श्री विठ्ठलाई देवी,यांच्या नूतन पाषाणी मूर्तीचा जिर्णोद्धार व कलशारोहण सोहळा ९ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधित संपन्न होणार आहे.
श्री. ष.ब्र.प्र. १०८ श्री गुरु महादय्या रविशंकर शिवाचार्य महाराज, (रायपाटण) यांच्या शुभहस्ते होणार आहे. मंदिराचा जिर्णोद्धार ज्यांच्या संकल्पनेतून होत आहे ते उद्योजक तुषार खेतल यांचेसह पाटगांव चे रहीवासी माजी मंत्री रवींद्र माने. विद्यमान आमदार शेखर निकम. माजी आम. रमेश कदम, सुभाष बने.सदानंद चव्हाण. चंद्रकांत भोजने. शंकर माटे. माझी जिप अध्यक्ष रोहन बने. मध्यवर्ती बँकेच्या संचालिका सौ नेहा माने. पाटगांव सरपंच सौ. ज्योती गोपाळ. देवरूखचे नगरसेवक संतोष केदारी. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्याचे कार्यक्रम पुढील प्रमाणे दि. ०९ फेब्रुवारी २०२३देवाच्या मूर्तीचे स्वागत व सहवा देवांना औक्षण व मंदिराभोवती प्र महाराजांचे प्रवचन व महाप्रसाद
देवांना धान्यधिवास व जलधिवास शय्यधिवास
शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ ध्वजारोहण व विधीविधान पुजन होम हवन,मुर्ती प्रतिस्थापना व महाआरती महाप्रसाद, प्रवचन (रायपाठण)bहरिपाठ व रात्रौ १०वा.श्री ह.भ.प. ब्रम्हचारी गुरुवर्य भागवत देवाची आळंदी यांचे सुश्राव्य किर्तन
दि. ११ फेब्रुवारी २०२३ लघुरुद्र आणि कलशारोहण महाआरती, महाप्रसाद, प्रमुख पाहूण्यांचे स्वागत व सत्कार दिपप्रज्वल व शिवपाठ रार्तो १० वा. केदारनाथ नमन मंडळ सावर्डे, चिप गुडेकरवाडी यांचे नमन असे संपन्न होणार आहेत हे सर्व कार्यक्रम श्री स्वयंभू सांब मंदिर पाटगाव, ता. संगमेश्वर, येथे होणार असून गावकरी. मानकरी सह भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचेवतीने करण्यात आले आहे.