लोकल न्यूज
‘इस्कॉन’च्या रत्नागिरीतील मंदिरात आज सायंकाळी पुष्पाभिषेक
रत्नागिरी : इस्कॉनच्या रत्नागिरी एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या मंदिरात रविवार दि. १५ रोजी सायंकाळी पुष्पाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
येथील मिरजोळे एमआयडीसी क्षेत्रात लायन्स आय हॉस्पिटल नजीक असलेल्या श्री श्री निताई सुंदर नवद्वीप चंद्र मंदिरात श्री श्री राधा माधव यांचा पुष्य अभिषेक आयोजित करण्यात येणार आहे. त्या शिवाय भगवंतांना ५६ भोग अर्पण करण्यात येणार आहेत.
यानिमित्त मंदिरात सायंकाळी होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.
६:३० ते ७:०० – गौर आरती व कीर्तन
७:०० ते ८:०० – प्रवचन
८:००ते ८:३० – आरती, पुष्य अभिषेक
८:३० ते ९ – कीर्तन
९:०० ते ९:३० – महाप्रसाद
या कार्यक्रमात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉन रत्नागिरी मंदिर व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.