लोकल न्यूज
कै. राजू बर्वे मित्रमंडळातर्फे उद्यापासून ह. भ. प. शरदबुवा घाग यांची कीर्तनमाला
रत्नागिरी : शहरातील साऊंड व्यावसायिक, संगीत, नाट्यक्षेत्रातील हरहुन्नरी कलाकार कै. रामचंद्र गणेश ऊर्फ राजू बर्वे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तीन दिवसीय कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
नरसोबाची वाडी येथील ह. भ. प. श्री. शरदबुवा घाग यांच्या सुश्राव्य कीर्तनमालेने कै. रामचंद्र गणेश ऊर्फ राजू बर्वे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. खालची आळी येथील श्री मुरलीधर मंदिर येथे सोमवार दि. 20 ते बुधवार दि. 22 फेबुवारी 2022 रोजी सायं. 6:30 ते 9:00 या कालावधीत ही कीर्तनमाला होणार आहे. रत्नागिरीतील नागरिकांनी व राजू बर्वे मित्रपरिवाराने या कीर्तनमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कै. राजू बर्वे मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.