लोकल न्यूज
नाणीज येथे राजरोस दारू धंदे सुरू

महिलेविरोधात गुन्हा दाखल
नाणीज : येथील नाणीज – तळीवडी येथे बेकायदेशीर दारू बाळगल्या प्रकरणी बुधवारी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नाणीज तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुण दारू सोडण्यासाठी येथे येतात. असे असताना येथे दारू विकणे गैर आहे. त्यामुळे येथील सर्व दारू धंदे कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी वेळोवेळी ग्रामस्थांनी केली आहे.
बुधवारी नाणीज तळवाडी येथील सुरेखा बाळकृष्ण पंडित (वय ४२) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे. सदर महिला येथील जुन्या मठा समोर दारू विक्री करताना सापडली.
याबाबत पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
