आठचे १६ डबे होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस तासाभरात फुल्ल!

रत्नागिरी : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने मुंबई ते मडगाव दरम्यान चालवण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस 8 ऐवजी 16 डब्यांची करूही आरक्षणासाठी खुली होताच पुढील तासाभरातच पूर्ण क्षमतेने भरली.
कोकण विकास समिती तसेच अखंड कोकण रेल्वे सेवा समिती यांच्यावतीने मुंबई ते गोवा दरम्यान चालवण्यात येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान चालवण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस आठ डब्यांऐवजी 16 किंवा 20 डब्यांची चालवण्यात यावी, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अखेर रेल्वेने 22229 /22230 ही गाडी दिनांक 25 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीसाठी 8 ऐवजी 16 डब्यांची जाहीर केली. या निर्णयानुसार या गाडीच्या डाऊन च्या तीन तरफ च्या तीन अशा एकूण सहा फेऱ्या या आठ ऐवजी 16 डब्यांच्या होणार आहेत.
दरम्यान दुप्पट क्षमतेच्या झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण खुले झाल्यानंतर पुढील काही तासात संपले देखील. या एकूणच परिस्थितीमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढीव गाड्यांची किती गरज आहे हे अधोरेखित झाले.