कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बळ वाढवलं पाहिजे : ना. डॉ. उदय सामंत

- शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठक
रत्नागिरी : शिवसेनेचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाचं कार्य पोहोचवून आणि शिवसेनेचं बळ वाढवलं पाहिजे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले.
शनिवारी माळनाका, रत्नागिरी येथे शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी बैठकीला उपस्थिती दर्शवली.
जिल्ह्यातील शिवसेना सभासद नोंदणी मोहीम, तसेच आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांचा आढावा घेत पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी सांगितलं की आज आम्ही कार्यकर्त्यांसाठी १८-१८ तास काम करत आहोत. त्यांचं बळ हेच शिवसेनेचं खऱ्या अर्थानं सामर्थ्य आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात पक्षाचं कार्य पोहोचवून आणि शिवसेनेचं बळ वाढवलं पाहिजे.
महायुतीमध्ये असलो तरी शिवसेना वाढू नये असा कुठलाही अडसर नाही. त्यामुळे प्रत्येक भागात प्रत्येक गटात शिवसेना वाढली पाहिजे शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात, प्रत्येक गटात एकत्र येऊन काम केलं पाहिजे.
डॉ. उदय सामंत,
पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा.
विधानसभेला “तुम्ही आमच्यासाठी प्रचार केला, आता तुमच्या निवडणुकीसाठी आम्ही घराघरात पोहोचू!” असा विश्वास त्यांनी दिला. कोणत्याही उमेदवाराला तिकीट मिळालं तरी तो निवडून यावा याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी असे वक्तव्य या बैठकीच्या निमित्ताने केलं.
या बैठकीला मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, शिवसेना नेते राजेंद्र महाडीक, माजी आमदार सुभाष बने, संजय कदम, सदानंद चव्हाण आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.