महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

खुशखबर!!! रत्नागिरीत ४५९ होमगार्ड पदांची निघाली भरती

  • 25 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत मागवले ऑनलाईन अर्ज

रत्नागिरी, दि. 23 : जिल्हा होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या 382 पुरुष व 77 महिला अशा एकूण 459 जागा भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन केलेले आहे. 15 ऑगस्ट अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. 25 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर होमगार्ड नोंदणीची माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती उपलब्ध आहे.

होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीकरिता अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी केले आहे.

admin

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button