महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण
जिल्ह्यातील सर्व शाळांना २१ जुलै रोजी सुट्टी
रत्नागिरी, दि.२० (जि.मा.का.) : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार २० ते २४ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आॕरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण आणि खेड तालुक्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चिपळूण व खेड तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि गर्दीमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्ह्यातील सर्व शाळांना (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) २१/०७/२०२३ रोजी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सुट्टी जाहीर केली.