टपाल विभागाची पेन्शन अदालत २९ सप्टेंबर रोजी मुंबईत
रत्नागिरी, दि.७ (जिमाका) : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी ५३ वी पेंशन अदालत २९ सप्टेंबर २०२३ रोजी ११ वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई ४००००१ येथे आयोजित केली आहे.
निवृत्तीवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे. टपाल विभागातील महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांचे तीन महिन्यांच्या आत पूर्तता झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे इत्यादी वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीवीओ पी/एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारक विहीत प्रपत्रामध्ये आपले अर्जाचे तीन प्रती लेखाधिकारी अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई ४००००१ ला २५ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने (तक्रारींची मोठ्या प्रमाणात / इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. मुदतीनंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.