महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
आरवली बस थांब्यावरील उघडे गटार प्रवाशांसाठी धोकादायक

आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली बाजारपेठेत उडण पुलाखालील सर्व्हिस रोडच्या थांब्यावर ठेकेदाराने उघडे ठेवलेले रस्त्यालगतचे गटार प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली बाजारपेठेतून जाणाऱ्या एका बाजूच्या सर्व्हिस रोडच्या काँक्रिटीकरण्याचे काम अलीकडेच पूर्ण करण्यात आले आहे. उड्डाणपुलाखाली असलेल्या या थांब्यावर ठेकेदाराने गटाराचे काम करताना झाकणे बसवून गटार बंद केलेले नाही. उघडे ठेवण्यात आलेले हे गटार प्रवाशांसाठी धोकादायक ठरले आहे. पाऊसही सुरू झाल्याने हा धोका आणखी वाढला आहे.
एसटी बस भर थांब्यावर असलेल्या या उघड्या गटारावर तातडीने झाकणे बसवावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ दिनेश परकर यांनी केली आहे.