देवरूखमध्ये ४ ते ९ नोव्हेंबरपर्यंत मोफत लाईफगार्ड सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन
देवरूख : कौशल्य विकास भारत सरकारतर्फे ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथे लाईफ गार्ड सर्टिफिकेट कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळीची सुट्टी योग्य मार्गाने उपयोगात यावी, या हेतूने देवरूख शहरातील खालची आळीमधील नक्षत्र मंगल कार्यालय येथे दि. ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करताना स्वतः प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग स्वत व दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून १० वी पास तसेच १८ ते ४५ वयोगटातील स्त्री-पुरुषांना यामध्ये सहभागी होता येणार आहे.
आधारकार्ड, १० वी सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे युयुत्सू आर्ते यांनी स्पष्ट केले आहे. या कोर्सविषयी अधिक माहितीसाठी युयुत्सू आर्ते- 9422351926 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.