नगर पंचायत रूपांतरित पूर्वाश्रमीचे ग्रा. पं. कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात; ६ ऑगस्टला प्रत्येक न.पं. मध्ये ‘काम बंद’
- नगर पंचायत सेवा अधिनियमानुसार वेतनश्रेणी व फरकासाठी संघर्ष समिती आक्रमक
- १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण
लांजा : लांजा नगरंचायतीचे पूर्वाश्रमीचे ग्रामपंचायत सेवा केलेल्या कर्मचारी यांना नगर पंचायत सेवा अधिनियमानुसार वेतन आणि फरक मिळावा, यासाठी राज्य नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचारी संघर्ष समिती आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. समितीने या संदर्भात जिल्हाधिकारी याना निवेदन सादर केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर १ जुलै रोजी लाक्षणिक उपोषण आणि ६ ऑगस्टला प्रत्येक नगर पंचायत आणि नगर परिषद कर्मचारी ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात नव्याने निर्माण झालेल्या नगर पंचायातीमध्ये पूर्वाश्रमीचे कर्मचारी ग्रामपंचायत सेवेमध्ये कायम होते. गेल्या सात वर्षापासून सर्व कर्मचारी लाभांपासून वंचित आहेत. त्यातील काहीजण येत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु, या कर्मचाऱ्यांना नगर पंचायत सेवा लाभ मिळाले नाही. ग्रामपंचायत सेवा ही या कर्मचाऱ्यांन धरून यांना लाभ देण्यात यावेत, अशी मागणी आहे.
नगरपंचायत मध्ये सांभाळ झालेल्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे अशस्वित प्रगती योजनेचा या कर्मचाऱ्यांना मिळावा कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्यात यावे नगर परिषद नगर पंचायत यांना समान वेतन देण्यात यावे जो जकात कर रद्द करण्यात आला आहे. तो पुन्हा सुरू करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.