रत्नागिरी अपडेट्स
ना. उदय सामंत यांच्या हस्ते उद्या मिरजोळेतील विकास कामांचे भूमिपूजन व उद् घाटन
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मिरजोळे गावातील सर्व विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन मंगळवार दि.४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी कारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय मिरजोळे येथील हॉलमध्ये दुपारी ३ वाजता येणार आहेत. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. विकास कामाच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमाना ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेनेकडून करण्यात आले आहे.