महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदाच्या २८४ जागांसाठी १ ते ८ जुलै दरम्यान परीक्षा

रत्नागिरी, दि. २६ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड संवर्गात 284 पदे भरतीसाठी आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची 1 जुलै ते 8 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाने कळविले आहे.

परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे. परीक्षेकरिता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध रहावे, असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड संवर्गात 284 पदे भरती करिता दि. 22 एप्रिल रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दि. 22 एप्रिल ते 16 मे 2025 कालावधीत ऑनलाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button