पुण्यातील राज्य सब-ज्युनियर कराटे स्पर्धेत रत्नागिरीतील खेळाडूंची चमकदार कामगिरी
पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे दि. 28 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सब-जुनिअर कराटे स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्हा अमॅच्युअर कराटे असोसिएशन व आशिहारा कराटे रत्नागिरी च्या संघाने डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ खेळाडूंनी आपल्या खेळाचे उत्तम सादरीकरण करत सहभाग नोंदविला होता. यामधे रक्षा पाटील,अहलाम काझी, या काझी, रुद्र निंभोरे, विहंग जानवळकर, ताईब माहिमकर,साईम मालगुंडकर यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
तेरा वर्षाखालील 55 किलो वजनी गटात दानिश तडवी (गुहागर)- सुवर्णपदक, 10 वर्षाखालील 42 किलो वजनी गटात अन्वी जानवळकर(गुहागर)- रजत पदक,12 वर्षाखालील 52 किलो वजनी गटात श्रावणी गुरव (रत्नागिरी)- कांस्यपदक, 13 वर्षाखालील 42 किलो वजनी गटात गौरी निंभोरे (गुहागर)- कास्यपदक, 8 वर्षाखालील 30 किलो वजनी गटात फरहान धामस्कर(गुहागर)- कास्यपदक , 13 वर्षाखालील 55 किलोवरील वजनी गटात खुशीयाल गुप्ता याने कास्यपदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंना डॉ. योगिता खाडे तसेच प्रशिक्षक स्वप्नाली पवार आणि हुजैफा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.