महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
पोफळी येथे ४ डिसेंबरला जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रम
चिपळूण : अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा यांच्यातर्फे जागतिक अपंग दिनानिमित कार्यक्रमचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कोकण विभाग प्रमुख फैसल सय्यद यांनी दिली.
हा कार्यक्रम 4 डिसेंबर 2023 सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोफळी सय्यदवाडी क्रमांक 01 ता चिपळूण जिल्हा रत्नागिरी इथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी चिपळूणचे आमदार शेखरं निकम हे उपस्थित राहणार आहेत. तसेच शासनाचे अधिकारी देखील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
याच दिवशी संघटनेच्या जनसंपर्क कार्यलयचा उदघाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पाड पडणार आहे. तरी चिपळूण तालुक्यातील दिव्यांगांनी या कार्यक्रमाला जास्त जास्त संख्याने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष युसूफ तांडेल यांनी केले आहे.