फाटक हायस्कूलच्या तपस्या बोरकर, बिल्वा रानडे, पूर्वा जोशी यांचे वक्तृत्व स्पर्धेत यश

रत्नागिरी : नवनिर्माण हायस्कूल येथे
झालेल्या कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत फाटक हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनींनी यश मिळवले. माध्यमिक गटात तपस्या बोरकर हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर पूर्वा जोशी हिने तृतीय क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात मराठी माध्यमातून 30 स्पर्धक होते आणि इंग्रजी माध्यमातून 12 स्पर्धक होते. तपस्या बोरकर हिने ‘विज्ञान कथाकार : जयंत नारळीकर’ हा विषय निवडला होता. तर पूर्वा जोशी हिने ‘समाजरत्न रतन टाटा’ हा विषय मांडला.

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयीन गटात बिल्वा रानडे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थिनी व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन प्रशालेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षक नेहा शेट्ये व संस्थेचे पदाधिकारी यांनी केले.