मडगाव-पनवेल मार्गावर आज अनारक्षित मेमू स्पेशल गाडी धावणार!

राजापूर, लांजाला एकही थांबा नाही; खेडपासून पुढे मात्र लोकलसारखे थांबे!
रत्नागिरी : वीकेंडला कोकण रेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मडगाव ते पनवेल मार्गावर दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी अनारक्षित मेमू गाडी चालवली जाणार आहे. या गाडीला राजापूर तसेच लांजा तालुक्यात एकही थांबा नाही. मात्र, खेडपासून पुढे कोकण रेल्वेने लोकल गाडीसारखे थांबे दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०७१०४ मडगाव जं. – पनवेल मेमू स्पेशल (अनारक्षित) मडगाव जंक्शन येथून दि. 30/09/2023 रोजी सकाळी 07:30 वाजता सुटून ती त्याच दिवशी ८.३० वाजता ती पनवेलला पोहोचणार आहे.
याचबरोबर गाडी क्रमांक ०७१०३ पनवेल – मडगाव जं. MEMU विशेष (अनारक्षित)l सोमवार 02/10/2023 रोजी पनवेल येथून रात्री ९ वा. १० मिनिटांनी सुटून मडगाव जंक्शनला दुसऱ्या दिवशी सकाळी 09:30 वाजता पोहचेल.
मडगाव -पनवेल मेमूचे थांबे
करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड आणि रोहा.
ही गाडी एकूण आठ डब्यांची धावणार आहे.