मत्स्यालय व्यवस्थापनावर रत्नागिरीत प्रशिक्षण कार्यक्रम ; महाराष्ट्रासह इतर राज्यातील प्रशिक्षणार्थींचा सहभाग
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ मध्ये “मत्स्यालय व्यवस्थापन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १ ते ३ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर, २०२३ रोजी पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः खेड-रत्नागिरी, सावंतवाडी, रायगड, ठाणे, विरार, तारापूर-पालघर, बोईसर, गडहिंग्लज, कोल्हापूर, आंबेगाव-पुणे, वसई, जळगाव, मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग, व रत्नागिरी येथील प्रशिक्षणांर्थीनी आणि विशेष म्हणजे गोवा राज्यातील बिचोली तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला.
प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवसात शोभिवंत माशांच्या जातींची ओळख, मत्स्यालय व्यवस्थापन, जिवंत खाद्याचे प्रकार आणि तयार करण्याच्या पद्धती, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य बनविणे, रोग व उपाय, शोभिवंत माशांची काढणी, पॅकींग व वहातुक व्यवस्थापन, शोभिवंत पान-वनस्पतींच्या अभिवृद्धी पद्धती, शोभिवंत मासे बिजोत्पादन केंद्र बांधणी, शासनाच्या अनुदान योजना या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बार्ब, डॅनिओ मासे, गोल्डफिश, कोई मासे, गप्पी मासे, एंजल, डिस्कस माशांच्या प्रजनन पद्धती यावर मार्ग दर्शन करण्यात आले.
प्राशिक्षण दरम्यान जास्तीत जास्त प्रात्यक्षिकवर भर देण्यात आला. प्रशिक्षणार्थीनी स्वतः मत्स्यालय टाकी बनविणे, खाद्य बनविणे, पाण्याची प्रत तपासणे अशी प्रात्यक्षिक अनुभवलीत. यावेळी ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ रत्नागिरीचे डॉ. आशिष मोहिते, डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. संतोष मेतर, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे, श्रीमती वर्षा सदावर्ते आणि श्री रमेश सावर्डेकर यांनी मार्गदर्शन केले. कोंकण कृषि विद्यापीठाचे मुळदे येथील मत्स्य संशोधन केंद्राचे डॉ. एम.एम. घुगुस्कर आणि श्री. कृपेश सावंत यांनी देखील प्रशिक्षनार्थिना मार्गदर्शन केले. माहाराष्ट्र राज्य शासनाच्या मॅनग्रुव्ह फाउंडेशन प्रकल्पाचे रत्नागिरी येथील श्री. प्रणव बांदकर यांनी देखील मार्गदर्शन केले. रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाईक श्री. सुयोग भागवत तसेच शोभिवंत मासे (एंजल आणि डिस्कस मासे) प्रजनन करणारे श्री. गौरव आठले, तसेच हर्णे-दापोली येथील शोभिवंत मासे (गप्पी मासे) प्रजनन करणारे श्री. फहाद जमादार यांनी प्रशिक्षणार्थीना स्व-अनुभव कथनाद्वारे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रक्षेत्र भेट ही मॅनग्रुव्ह फाउंडेशन प्रकल्प अंतर्गत मिऱ्या, रत्नागिरी येथे असलेला श्री. सुरज शिरधनकर यांचा सागरी शोभिवंत मासे पालन प्रकल्पावर देण्यात आली.
प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. ३ नोव्हेंबर, २०२३ रोजी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली-हर्णे येथील शोभिवंत मासे व्यावसायिक श्री. फहाद जमादार उपस्थित होते. प्रशिक्षणार्थीनी मान्यवरांना आपली ओळख आणि अनुभव कथन करताना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संशोधन केंद्राचे आभार व्यक्त केले. सर्वच प्रशिक्षणार्थी प्रौढ वयातील आणि शोभिवंत मत्स्य क्षेत्रातील अनुभवी असून सुद्धा त्यांनी सदर प्रशिक्षण हसत-खेळत पार पाडले असे मत मांडले. तसेच त्यांनी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग पुढील आयुक्शात व्यवसायामध्ये करण्याचा मानस व्यक्त केला. प्रशिक्षणार्थी श्री. नितीन बापट, श्री. विलास म्हेतर आणि सौ. भाग्यश्री गजानन केरकर यांनी आपले मत मांडले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक प्रा. नरेंद्र चोगले यांनी केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. फहाद जमादार यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षनार्थीना आपण मदत करण्यास सदैव तयार असल्याचे सांगितले. त्यांनी शोभिवंत मत्स्य व्यवसाय मध्ये मार्गदर्शन करिता प्रशिक्षनार्थिनी निसंकोष संपर्क करण्याचे आव्हान केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे फलित म्हणून या प्रशिक्षणार्थींनी या व्यवसायास आपले योगदान द्यावे असे आव्हाहन केले. त्यांनी आपले संशोधन केंद्र व सर्व शास्त्रज्ञ भविष्यात प्रशिक्षणार्थींना हवी असलेली तांत्रिक मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासित केले. सर्व प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सहभाग बद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन प्रा. कल्पेश शिंदे, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे फोटोग्राफी श्री. मनीष शिंदे, यांनी केली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक यांनी केले.
या कार्यशाळेच्या आयोजनाकरिता संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा. नरेंद्र चोगले (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. आसिफ पागरकर, (प्राध्यापक), डॉ. हरिष धमगये (सहयोगी प्राध्यापक), प्रा. कल्पेश शिंदे (सहाय्यक संशोधन अधिकारी), डॉ. संतोष मेतर (अभिरक्षक), प्रा. सचिन साटम (सहाय्यक संशोधन अधिकारी), श्रीमती वर्षा सदावर्ते (जीवशास्त्रज्ञ), श्री. रमेश सावर्डेकर (प्रयोगशाळा सहाय्यक) यांनी विशेष परिश्रम घेतलेत. तसेच कार्यालायातील कर्मचारी श्रीमती जाई साळवी, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री मुकुंद देऊरकर, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. प्रवीण गायकवाड, श्री. राजेंद्र कडव, श्री. तेजस जोशी, श्री. स्वप्नील आलीम, श्री. योगेश पिलणकर, श्री. अभिजित मयेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करिता विशेष सहकार्य केले.