मत्स्य अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांना रोटरी क्लब रत्नागिरीकडून टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड प्रदान

रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरी हा रत्नागिरीमध्ये गेल्या 68 वर्षापासून कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे. क्लब कडून दरवर्षी टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड किंवा नेशन बिल्डर अवॉर्ड दिले जातात. या वर्षीचा टीचर एक्सलन्स अवॉर्ड सोहळा हॉटेल विवेक येथे पार पडला .रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल डॉक्टर लेनी डिकोस्टा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी रत्नागिरीतील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले . डॉ केतन चौधरी हे गेल्या 30 वर्षापासून मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी येथे कार्यरत असून शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणात केलेल्या कार्याबद्दल त्यांना टीचर्स एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.
प्रांतपाल लेनी डिकोस्टा यांनी त्यांना शाल श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब रत्नागिरीचे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी आणि सचिव श्री विरकर, वरिष्ठ रोटरीन श्री दिलीप भाटकर, श्री धरमसी चौहान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी कळंबटे आणि वेदा मुकादम यांनी केले.





