महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त गणपतीपुळ्यात मिठाई वाटपासह जल्लोष साजरा
रत्नागिरी : मुंबईत आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर गणपतीपुळे येथे भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.भारतीय जनता पक्ष दक्षिण रत्नागिरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत विनायक घनवटकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा कार्यकरिणी सदस्य व शक्ति केंद्रप्रमुख राज देवरुखकर, बूथप्रमुख सुयोग भिडे, युवा कार्यकर्ता , मा. जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉ. चैतन्य वामन घनवटकर, गणपतीपुळे ग्रामपंचायत सदस्य सौ. मृणाल महेश घनवटकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मोरेश्वर घनवटकर, महिला कार्यकर्ता रेखा दामोदर जोशी कोतवडा जिल्हा परिषद गट युवासेना प्रमुख अमित प्रभाकर घनवटकर, अमोल अनंत गुरव, यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सदर जल्लोष कार्यक्रमास उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य सरकारचा शपथविधी कार्यक्रम श्री सुयोग भिडे यांच्या निवासस्थानी ऑनलाइन पद्धतीने दाखवण्यात आला. यानिमित्त मोरया चौक येथे यावेळेस फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिठाई, आईसक्रीम, आणि अल्पोपहार याचे वाटप करून आनंद द्विगुणित करण्यात आला. सोबतच सर्वांनी जय श्रीराम म्हण देशभक्तीपर घोषणा दिल्या.
उपस्थित भक्तगण पर्यटक आणि स्थानिकांनी यावेळेस समाधान व्यक्त केले.