मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात

चिपळूण : मांडकी – पालवण, ७ नोव्हेंबर २०२५, कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथे ‘वंदे मातरम्’ सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शासकीय निर्देशानुसार हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक श्री. ज्ञानोबा बोकडे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सामूहिक ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत गायनात उत्साहाने सहभाग घेतला.





