माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिर

देवरूख : आंबव येथिल राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 या कालावधीत 7 दिवसांचे निवासी शिबिर आंबव गावात मोठ्या उत्साहात पार पडले.
शिबिरात आंबव मधील नदीवर बंधारा बांधणे, कालिश्री देवी व विठोबा मंदिर परिसराची स्वच्छता, नदी स्वच्छता अभियान, कालिश्री व आंबव रस्त्यांची दुरुस्ती तसेच गावकऱ्यांसाठी पथनाट्य सादरीकरण असे विविध उपक्रम राबवण्यात आले.
उद्घाटन समारंभास संस्थेचे अध्यक्ष माननीय रविंद्रजी माने साहेब , कार्यकारी अध्यक्षा सौ. नेहाजी माने, गावच्या सरपंच सौ. माधवी अधटराव आणि उपसरपंच रुपेश माने, हे मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात,भारतीय अर्थसंकल्प 2025 या विषयावर प्रा. मंदार जाखी, जिओ-पॉलिटिक्स यावर डॉ. अरविंद कुलकर्णी, पर्यावरण जागरूकता यावर श्री.अणेराव, शाश्वत विकास यावर प्रा. आशीष सुवारे, करिअर मार्गदर्शन यावर डॉ. अनिरुद्ध जोशी आणि नेत्रदान-रक्तदान जागरूकता याविषयावर डॉ. रुपेश यादव यांची व्याख्याने झाली.
समारोप समारंभात आंबव गावातील माजी कॅप्टन श्री.कदम यांनी विद्यार्थ्यांना सशस्त्र सेनेतील रोजगार संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक प्रा. कादंबरी बागायतकर ,डॉ. अच्युत राऊत ,प्रा. समृद्धी वाजे, प्रा. दीपक यादव व सहाय्यक अधिकारी प्रा. ऋतिक मयेकर या सर्वांचे योगदान लाभले.