महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी टनेलमधील वाहतूक १५ दिवसांसाठी बंद

खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या कशेडी बोगद्यामधील वाहतूक पंधरा दिवसांसाठी उर्वरित कामांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून दोन मार्गीकांचा बोगदा निर्माण करण्यात आल्याने घाटमार्गे होणारी वाहतूक अवघ्या काही मिनिटात होऊ लागल्याने महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बोगद्यामधील अपूर्ण अवस्थेत असलेली कामे पूर्ण करणे तसेच बोगदाकडे जाणाऱ्या पुलावर गर्डर चढवण्याच्या कामासाठी पंधरा दिवसांचा वाहतूक ब्रेक घेण्यात आला आहे.