महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून प्रस्तावित मतदान केंद्रांची पाहणी

रत्नागिरी, दि. 28 : नगरपरिषद/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक -2025अनुषंगाने प्रभाग क्रमांक 7 मधील नगरपरिषद शाळा क्र.15 (दामले विद्यालय) येथे प्रस्तावित मतदान केंद्रांची किमान आवश्यक मूलभूत सुविधांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज ( मंगळवारी) पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, अधीक्षक न.पा.प्र. प्रविण माने, नगरपरिषद अभियंता यतिराज जाधव, वाहन विभाग प्रमुख जितेंद्र विचारे आदी उपस्थित होते





