महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
रत्नागिरीतील मिऱ्या बंदरावर अनोळखी पुरुषाचा मृतदेह
रत्नागिरी : मिऱ्याबंदर येथे 3 मे 2024 रोजी सकाळी 8.30 वा पूर्वी खाडीच्या पाण्यात अनोळखी पुरुष मयत स्थितीत मिळून आला आहे. अनोळखी मयत पुरुषाचा नावा-गावाचा अथवा नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नाही.
मृत व्यक्तीचे वय सुमारे 30 ते 40 वर्षे, उंची 5 फूट 8 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, डोक्यावर काळ्या रंगाचे बारीक केस, मिशी बारीक, दाढी केलेली, डोळे बंद, माशांनी कुरतडलेले, तोंड बंद स्थितीत असून फुगलेले, खालच्या ओठाला खरचटलेले, दोन्ही डोळ्यांच्या वरच्या पापण्यांना खरचटलेले दिसत आहे. अंगावर कोणतेही कपडे नाहीत. या अनोळखी पुरुष मयत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.