रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अलर्ट ; परतीच्या प्रवासातही धुव्वाधार पाऊस


मच्छीमारांना बंदरात परतण्याच्या सूचना
रत्नागिरी : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना रविवारी ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सकाळपासूनच पावसाने धुवाधार बरसण्यासह परतीचा प्रवास सुरू केला आहे. हा पाऊस दणका येण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौकाना बंदरात परतण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून मुसळधार त्यातून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार रविवारी सकाळपासूनच पावसाने धुवाधार कोसळत परतीच्या प्रवासातही आपलं रौद्ररूप दाखवले आहे. अजून पूरस्थितीसारखा पाऊस नसला तरी त्याचा जोर कायम आहे.
दरम्यान, शनिवारी हवामान खात्याने संबंधित यंत्रणांना सतर्क करीत परतीचा पाऊस दणका देईल अशी शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी सकाळपासूनच भर पावसाळ्यातल्या जून जुलै सारखे वातावरण निर्माण झाले होते.