महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुर्वे यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

मुंबई : रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप सुर्वे यांनी आज राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री नितेश राणे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
नुकतीच रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड झाली. त्यामध्ये प्रथमच संदीप सुर्वे यांच्या रूपाने भाजपचा संचालक सभापती झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रत्नागिरितील मच्छी व्यावसायिकांच्या उन्नतीसाठी आणि विविध योजना राबवण्यासाठी नामदार राणे यांची महत्वाचे सहकार्य मिळावे अशी विनंती सभापती सुर्वे यांनी केली आहे.