जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मृणाल ठाकरे हिची राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव-2025 साठी निवड

चिपळूण : कृषिभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी-पालवण येथील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. मृणाल ठाकरे या विद्यार्थिनीची बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आगामी २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ मध्ये सहभागासाठी निवड करण्यात आली आहे.
दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव – २०२५’ या खेळाच्या मैदानात कु. मृणाल ठाकरे ची कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या विद्यार्थिनीच्या यशामध्ये मार्गदर्शक म्हणून मोलाचा वाटा हा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री बाळासाहेब सूर्यवंशी, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, क्रीडा शिक्षक प्राध. ज्ञानोबा बोकडे यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयाने या खेळाडूचे अभिनंदन केले असून, तिने आपल्या सर्वोत्तम खेळाच्या जोरावर महाविद्यालयाचा गौरव वाढवावा, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.





