लांजात आषाढी एकादशीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम

विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
लांजा : लांजा तालुक्यात आज अनेक ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पडले. तालुक्यातील तळवडे, वेरवली, भांबेड,रिंगणे आरगाव विठ्ठल मंदिर येथे भाविकांनी मोठीं गर्दी केली होती.
तालुक्याला मोठी वारकरी परंपरा आहे भात शेतीच्या कामातून मोकळीक मिळाल्यानंतर आज शेतकरी राजा आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या भक्ती मध्ये दंग झाला होता तळवडे येथील विठ्ठल मंदिर याला मोठी परंपरा आहे. बने कुटुंबीयांनी नवस फेडण्यासाठी श्री विठ्ठल मंदिर उभारणी चौरे गावात केली होती या मंदिरात आषाढी कार्तिकीला मोठी यात्रा भरत असे. आजही मोठ्या भक्ती भावाने आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त या मंदिरात स्थानिक ग्रामस्थ गावकरी विविध कार्यक्रम आयोजित करतात पारगाव गावालाही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
आमदार डॉक्टर राजन साळवी हे भांबेड येथे आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. विठ्ठल भक्तांसोबत आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी फुगडी घातली. विविध मंदिरामध्ये सप्ताह,भजन कीर्तन याचे आयोजन केले होते.