महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज

लांजातील सततच्या खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर उच्च दाब वाहिनीचे सर्वेक्षण

लांजा :  लांजा शहरातील सातत्याने खंडित होण्याऱ्या वीज पुरवठा समस्येवर आमदार डॉ. राजन साळवी यांच्या सूचनेनुसार आज महावितरणचे कार्यकारी उपअभियंता आणि शिवसेना शहर पदाधिकारी यांच्या उपस्थित ११ के. व्ही. ची विद्युत वाहिनी आणि २० खांब यांचे आज ( गुरुवारी) सर्वेक्षण करण्यात आले.


लाजा शहर आणि तालुका वीज पुरवठा सातत्याने खंडित होण्याचे प्रकार आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर आमदार डॉ. राजन साळवी यांनी मंगळवारी शिवसेना पदाधिकारी यांना घेऊन लांजा महावितरण कार्यलयावर धडकले होते. आमदार राजन साळवी यांनी उपअभियंता यांना लांजा शहर फिडर आणि 11 kv नवीन लाईन तातडीनं काम हाती घेण्यास सुचवले होते. त्यानुसार आज लांजा महावितरण उपकार्यकारी अभियंता श्री. दयानंद आसष्टेकर, लाईनमन प्रवीण शिवगण, प्रथमेश साळवी, लांजा शहर प्रमुख नागेश कुरूप, नगरसेवक राजू हळदणकर, आमदार राजनजी साळवी यांचे स्वीय सहाय्यक श्री. मयुरेश भट, अनंत इलेक्ट्रिकचे महेश नागले यांनी आय टी आय लांजा ते शहनाई हॉल या मध्ये 11KVA लाईन करिता सर्व्हे करून 20पोल ची नवीन लाईन जोडणी करीता प्रत्यक्ष पाहणी केली.

लवकरात लवकर ही लाईन टाकण्या संदर्भात कार्यवाही करण्यात येत असून , लांजा शहराला पुनस फिडरमधून विद्युत पुरवठा होत असून पुनस फीडर हा जंगलातून येत असल्यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे लांजा शहरासाठी आय टी आय लांजा ते शहनाई हॉल या नवीन लाइन संदर्भात सर्वे करुन लवकरात लवकर कार्यवाही करुन ती कार्यान्वित व्हावी व लांजा शहर वासियांना दिलासा मिळावा, यासाठी आमदार डॉ. राजन साळवी यांनी प्रयत्न केले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button