लांजात वन विभागाकडून सवलतीच्या दरात औषधी वनस्पतींच्या विक्रीसाठी स्टॉल
लांजा : लांजा वन विभागाच्या वतीने सवलतीच्या दरातील औषधी वनस्पती तसेच फळझाडे रोप विक्रीकरिता स्टॉल लांजा शहरात लावण्यात आला आहे.
‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत वन विभागाने वड, फणस, चिंच, बेल, पेरू, रक्तचंदन, निव आदी औषधी तसेच उपयोगी झाडे यांची रोपे सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. वन महोत्सव कालावधी त वनविभागाने वृक्ष लागवडी बाबत जनजागृती आणि प्रचार केला आहे लांजा वनविभाग अंतर्गत येथे वन विभागाचे नर्सरी आहे.
या नर्सरीमध्येही विविध प्रकारची उपयुक्त झाडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लांजा शहरात सहजरित्या झाडे उपलब्ध व्हावी, यासाठी आज लांजा वन कार्यालयाच्या शेजारी विविध झाडांची रोपे विक्री स्टॉल सुरू करण्यात आला आहे.
विक्री स्टॉलच्या शुभारंभ प्रसंगी यावेळी वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक श्रावणी पवार, नमिता कांबळे, कर्मचारी मंगेश आंबेकर, अमित लांजेकर, सत्यवान गुरव, तनुजा साळुंखे, शेतकरी आदी उपस्थित होते.